मुंबई : यंदाच्या उन्हाळ्यात फिरायला कुठं जायचं, याचं प्लानिंग तुम्ही करताय का? मग आयआरसीटीसी घेऊन आलंय खास व्हेकेशन टूर्स. तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुमच्या पसंतीनुसार खास टूर प्लान करून देण्याची जबाबदारी आयआरसीटीसी घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चमध्येच उन्हाच्या झळा अंग अंग जाळू लागल्यात. मग मेमध्ये वैशाख वणवा किती चटके देणार, याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळं यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठंतरी शांत, गारेगार ठिकाणी जावं, असं वाटतंय ना..? मग इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसी (IRCTC) आपल्या सेवेसाठी हजर आहे.



ग्राहकांच्या पसंतीनुसार खास टूर प्लान करण्याची योजना कंपनीनं सुरू केली आहे. त्यानुसार कधी, कुठं जायचं, तिथं काय खायचं आणि प्यायचं, कुठं आणि कसं फिरायचं, याचं प्लानिंग आयआरसीटीसी करून देणार आहे.


त्याशिवाय आपल्या खिशाचा विचार करून आयआरसीटीसीनं काही समर पॅकेज टूरही तयार केल्या आहेत. इतर ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात या टूर उपलब्ध आहेत. या टूर पॅकेजना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.


2014-15 मध्ये या माध्यमातून 200 कोटींची कमाई, 2015-16 मध्ये 225 कोटींची कमाई तर 2016-17मध्ये हा आकडा 250 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
 
रेल्वेनं यंदा प्रथमच ग्राहकांच्या पसंतीनुसार टूर प्लान करण्याची योजना आणली. ही योजना यशस्वी झाली तर रेल्वे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.