बेपत्ता जय वाघ प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश
जय वाघाच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या जय वाघाच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं पत्र पाठवल्याची माहिती भाजप खासदार नाना पटोले यांनी दिलीय. जय वाघाची शिकार करण्यात आल्याचा दावा पटोले यांनी केला होता. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरावा मागितला होता.
त्यानंतर पटोले यांनी सीबीआय चौकशीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. त्यावर संबंधित यंत्रणेला सीबीआय चौकशीचे आदेश पीएमओनं दिल्याचं आपल्याला पत्रानं कळवण्यात आल्याचं पटोले यांनी सांगितलंय.