मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातून शिवसेनेत इनकमिंग सुरुच आहे. निफाडमधील भुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


जयदत्त होळकर हे लासलगाव बाजार समितीचे सभापतीसुद्धा आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे भगवा ध्वज देऊन स्वागत केले.