मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत प्राणी पाहण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणीबागेतील प्रवेश शुल्क दहा पटीने वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना 100 रुपये आणि 12  वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. 


राणीबागेतील प्रवेश शुल्क याआधी 2003 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानुसार सध्या प्रौढांना 5 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना 2 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामधे आता या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे. राणीबागेचा विकास 2012 सालापासून पासून सुरु आहे. 


काही महिन्यांपूर्वी या राणीबागेत 8 हंबोल्ट पेंग्विन  आणण्यात आले. त्यापैकी एकाचा सुमारे दोन महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे अन्य पेंग्विनना सध्या इंटेरपिटिशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी असलेल्या काचेच्या पिंजऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.


दक्षिण कोरियातून हे पेंग्विन आणण्यात आले. 6 पेंग्विनवर दोन पेंग्विन हे भेट स्वरूपात देण्यात आले. ज्यासाठी महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपये अदा केले. तर पेंग्विनना राहण्यासाठी अनुकल असलेल्या काचेच्या पिंजऱ्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 


महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रवेशशुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे.  मागील 13 वर्षात प्रवेश शुल्कात वाढ केलेली नाही. त्यामुळे वाढ करण्याचे प्रस्तावित असले तरी गटनेत्यांच्या मंजुरीनंतरच याची अमलबाजावणी केली जाईल.