मुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा आणखी एक घोळ समोर आला आहे. सीईटीची तिसरी यादीच जाहीर करण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही यादी जाहीर करण्यापूर्वीच खासगी कॉलेजेसचे प्रवेश दिले जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सीईटीच्या तिस-या यादीत नंबर लागला, तर विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी कॉलेजमधले प्रवेश रद्द करावे लागणार आहेत. 


खासगी कॉलेजमध्ये ६० पेक्षा जास्त जागा यामुळं उपलब्ध होणार आहेत. या जागा आता महाविद्यालयं स्वतः भरणार आहेत. सरकारची तिसरी यादी वेळेत आली असती, तर खासगी संस्थांकडे जागा गेल्या नसत्या. त्यामुळं सरकार आणि खासगी संस्थांचं साटंलोटं असल्याचा आरोप पालक करत आहे. मात्र, असे कुठलंही साटंलोटं नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.