मुंबई : पोलिसांनी कांदिवलीमध्ये पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली, ही घटना व्हिडिओत कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीतील पॅसेजमध्ये पोलीस अधिकारी नवरा बायकोला बेदम मारहाण करीत असल्याचे दिसते. 


'एएनआय' वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.


हे दाम्पत्य पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. पण त्यांना पोलिसांनी मारहाण का केली, याबद्दल माहिती मिळालेली नाही. 


ही घटना १० मे रोजी घडल्याचे समजते. त्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या एका व्यक्तीने आपल्याकडील मोबाईलमधून या मारहाणीचे चित्रण केले. 


या प्रकरणात चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आलं आहे.