कॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ
कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कपिलने कार्यालय बांधकाम करताना तिवर झाडांची कत्तल केली आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते असद पटेल यांनी केला आहे. या तक्रारीमुळे कपिल शर्मा अडचणीत आलाय.
कपिल शर्मावर वसोर्वा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने कपिलच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, मी 15 कोटी रुपयांचा कर भरतो. असे असताना मला कामासाठी मुंबई महानगरपालिकेत पैसे द्यावे लागतात, असे सांगत त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅक करत ट्विट केले. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिलभाई म्हणत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या दखलबाबत राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत.
दरम्यान, मुंबई पालिका अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप करणाऱ्या कपिल शर्मा याने रितसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले. तर भाजप आमदार राम कदम यांनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे बेकायदा बांधकाम लपविण्यासाठी कपिलने हे नाट्य रचल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच तक्रार दाखल करण्यात आल्याने त्याच्या अडचणीत वाढ झालेय.