मुंबई: मुंबई महापालिकेत माफियाराज सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार किरीट सोमय्य़ांनी केलाय. वांद्रेतला बॉस आणि त्याच्या पीएच्या आदेशावरूनच हे माफियाराज सुरू असल्याचं सांगत सोमय्यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टार्गेट केल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर सोमय्यांनी स्पष्ट नाव घेऊन आरोप करावेत मग शिवसेना उत्तर देईल असं आव्हान शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिलंय. मुंबई भाजप अध्यक्ष शेलारांपाठोपाठ  आता सोमय्यांनी शिवसेनेवर आरोप केल्यामुळं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही रणनिती आहे का अशीही चर्चा रंगलीय.