मुंबई :  काही लोकांसाठी पारदर्शकता फक्त उच्चाराचा आणि आहाराचा शब्द आहे. मात्र आमच्यासाठी हा शब्द कमिटमेंटचा असल्याचा टोला, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डम्पिंग ग्राउंडचा घोटाळा बाहेर काढल्यानंच शिवसेनेच्या पोटात गोळा आला असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते, या दरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीत तणाव निर्माण झाला होता. यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.