मुंबई : ऐन उन्हाळात राज्याला लोडशेडिंगचे चटके बसण्याची शक्यता आहे. राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील वीजनिर्मीती प्रकल्पांतील वीजसंचामधून निर्मिती बंद झाली आहे. यात कोराडी, रतन इंडिया अदाणी, परळी, चंद्रपूर, मुंद्रा, तारापूर एनटीपीसी या प्रकल्पांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे.


यामुळे ऐन वैशाखवणव्यात अनेक ठिकाणी लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मनमाड शहरात झिरो लोड शेडिंगच्या नावाखाली रोज होणाऱ्या 12- 12 भारनियमनाला त्रस्त झालेल्या नागरिकांनी आरपीआयच्या नेतृत्वाखाली वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यलयात कोंडले