मुंबई : राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न ७ दिवसात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ते नागपुरात बोलत होते.


यंदा राज्यात विजेची २ हजार मेगावॅटची मागणी जास्त आली. तसेच खाजगी वीजनिर्मिती केंद्रातील वीज संयंत्रात तांत्रिक बिघाड आल्याने विजेची तूट निर्माण झाली आहे. ही तुट भरून काढण्यासाठी अदानी व इंडियाबुल्सला वीजनिर्मितीची क्षमता ५०० मेगावॅट वरून १ हजार मेगावॅट पर्यंत वाढवण्याची सूचना दिल्या आहेत. याचबरोबर शेतकऱ्यांवर सबसिडीचे १७ हजार कोटी रुपये असल्याने शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. मात्र कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही असेही बावनकुळे त्यांनी स्पष्ट केले आहे.