मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी. मुंबईत पुढच्या दोन ते तीन महिन्यांत स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार 25 ते 30 ठिकाणी सुरू होणार आहे. या बाजारांमध्ये शेतक-याकडून थेट माल विकत घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. याच आठवडी बाजाराचं आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं.


ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अश्या पद्धतीचे आठवडी बाजार सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.