मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेगाव जवळ वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी ही घटना घडली. यात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


पोलिसांनी दगडफेक करण्याऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याच्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.


दरम्यान या  तरुणाच्या दगडफेकीत १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर वाहन चालकासह ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. 


मिळालेल्या माहीतीनुसार दगडफेक केलेल्या तरुणाचे मानसिक संतुलन ठीक नाही. त्याने हे विध्वसंक कृत्य का केले, हे देखील समजू शकलेले नाही.