मुंबई : महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटना सरकारची जबाबदारी असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड दुर्घटना आमची जबाबदारी असून, १८० दिवसात महाडमधील पूल बांधून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 


तसेच दोन महिन्यात या पुलाचे बांधकाम सुरु होईल. त्याचप्रमाणे, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं करणार असल्याचेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केले. 


मंगळवारी रात्री महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. आतापर्यंत २४ जणांचे मृतदेह सापडले असून शोधकार्य सलग चौथ्या दिवशी सुरु आहे.