मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. दोन्ही एसटीतील २२ प्रवासी बेपत्ता आहेत. यापैकी काहींची मृतदेह हाती लागलेत. एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत किंवा वारसाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत. आतापर्यंत १२ मृतदेह हाती लागले आहेत.


महाडच्या सावित्री नदीची पातळी कमी झाल्याने शोधकार्याला पुन्हा गती आली. पावसानं काहीशी उसंत घेतल्याने नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. एनडीआरएफच्या जवानांना नदीमध्ये जाणं शक्य नसलं तरी पातळी कमी झाल्याने बेपत्ता एसटी बस आणि इतर वाहनं दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संध्याकाळ झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे.