मुंबई : ‘जीएसटी’साठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 29 ऑगस्टला 2016 अधिवेशन बोलावण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी) मंजुरी देण्यासाठी येत्या २९ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी हे अधिवेशन २९ ऑगस्टला घेण्याचे निश्चित केले.


या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताने मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आसाम आणि बिहार राज्यात जीएसटीला मंजुरी देण्यात आली आहे.