मुंबई : कोपर्डी घटनेचा निषेध करताना, मराठा समाजाने संयम दाखवला त्या बद्दल, मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. हे मूक मोर्चे आहेत, यात कोणतीही घोषणा किंवा नारा नसल्याने आयोजकांचे आपण आभार मानतो, तसेच लोकशाही मार्गाने समाजाने आक्रोश दाखवला, तर तो सरकार निश्चित समजून घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाज कल्याण खात्याचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


यावेळी बोलताना मुऱ्यमंत्री म्हणाले, कोपर्डीच्या घटनेचं काही लोक राजकारण करीत आहेत. कोपर्डी घटना गंभीर आहे, त्याचा निषेध सर्वानी केला. गुन्हेगाराला जात नसते, आज मोर्चे निघत आहेत, हा एका प्रकारचा आक्रोश आहे, या मोर्चाचा दुसरा अर्थ काढण्याचे कारण नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


एकीकडे आपली ताकद दाखवत असताना मराठा समाजाने मोठा सयंम देखील दाखवला. त्यामुळे आयोजकांचे धन्यवाद, धन्यवाद यासाठी की लोकांना याचे राजकारण करायचे आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजता येईल का हे ते पाहात आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.


मोदी आणि आमच्या कामाने ज्यांची राजकीय दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


मराठा समाजाने संयम दाखवला, लोकशाही मार्गाने आक्रोश दाखवला तर तो सरकार निश्चित समजून घेईल.


आम्ही आई बहिणींच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. महाराष्ट्र, तसेच देशातील नेत्यांनी समाजात तेढ़ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.सत्ता येते जाते. पण सत्तेकड़े येण्याचा मार्ग हां समाजात तेढ़ निर्माण करुन शोधत असू तर तो तात्कालिक फायदा होईल. यात देश, राज्य आणि समाजाचा फायदा नाही, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.