मुंबई : राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या ५७व्या वर्धापनादिनानिमित्त आज दादरच्या शिवाजीपार्कवर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते  शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी उपस्थित होते. यानंतर राज्य पोलिसांच्या वतीनं राज्यपालांना मानवंदनाही देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाआधी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना श्रद्धाजली वाहिली. हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित होते. 


महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संक्ल्प यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.सर्व समावेषक महाराष्ट्राचं आश्वासनंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.