मुंबई : उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय मंडळे तसेच ट्रस्टना देणगीचा तपशील देणे बंधनकारक आहे. तसेच देणगीसाठी दात्याला दमदाटी करता येणार नाही. या अटींचे उल्लंघन केल्यास, नव्या कायद्यानुसार दीडपट आर्थिक दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूद करण्यात आलीय. 


या मुद्यावरुन शिवसेनेशी मतभेद नसल्याचं विधी आणि न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यातून सरकार उत्सव आणि सणावर बंदी आणत नसून, ते नियमानुसार साजरे व्हावेत, तसेच सामान्यांना त्याचा त्रास होऊ, नये ही भूमिका हा कायदा करण्यामागे असल्याचेही रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले.