मुंबई : भिवंडी, पनवेल आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान झालं. प्रचाराचा प्रचंड धुराळा उडालेल्या या तिन्ही महापालिकेमध्ये मतदाना दिवशी मात्र संमिश्र प्रतिसाद मिऴाल्याचे चित्र दिवसभर दिसले. याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगाव 58 टक्के मतदान झाले. तर पनवेलमध्ये 50 टक्के तर भिवंडीत 54 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


मालेगावमध्ये एका शाळेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी व्यतिरिक्त कुठेही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. तिन्ही ठिकाणी मतदान मात्र शांततेत पार पाडलं.


राज्यात या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालात भाजपने बाजी मारली होती. आज झालेल्या महापालिका मतदानाचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे.


कडक उन्हाचा चटका यामुळे मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा थंड प्रतिसाद दिसून आला. तर अनेक मतदानकेंद्रांवर शुकशुकाटच जाणवत होता. मालेगावमध्ये पाऱ्याने ४३  अंशांचा  टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांचा अल्प प्रतिसाद लाभलेला दिसून आला. परिणामी मतदान केंद्रांवर कुठेही लांब रांगा पाहायला मिळाल्या नाहीत. तर अनेक मतदान केंद्रांवर बंदोबस्तावरचे पोलिसच पाहायला मिळाले.


पैसे घ्या पण भाजपला मतदान करण्याचं वक्तव्य केलंय लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी. रेणापूर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले.


पनवेल महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीकरताच्या मतदानासाठी, मतदारांची म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही. कडक उन्हाळा आणि सुट्टीचे दिवस ही यामागची कारणं आहेत अशी प्रतिक्रिया, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.


पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारराजा शेकापच्या बाजूनेच कौल देईल असा विश्वास, शेकाप नेते विवेक पाटील यांनी केलाय.