मुंबई : पाकिस्तानी कलाकार माहिरा खान ही रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, शाहरूख खानने आपल्याला हे सांगितलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अभिनेता शाहरूख खान आज, राज ठाकरे यांच्या दादरच्या कृष्णकुंज निवासस्थानी आला होता.  माहिरा खान रईस चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे, या बातमीनंतर शाहरूख राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याची चर्चा होती.


राज ठाकरे यांची शाहरूखने भेट घेतल्यानंतर नेमकं काय बोलणं झालं यावर राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, पाकिस्तानी कलाकार माहिरा खान रईस चित्रपटाच्या प्रमोशनला येणार नाही. 


यापुढे जोपर्यंत उभय देशातील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत एकही पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटात घेणार नसल्याचंही शाहरूखने सांगितल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.