मुंबई : दहिसर रेल्वे स्टेशननजिक एका तरुणानं स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आपलं जीवन संपवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना स्वत:च्या डोळ्यांनी पाहणाऱ्या प्रवाशांचा मात्र या घटनेनं थरकाप उडालाय.


कशी घडली घटना... 


मख्तार शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येच्या वेळी सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. यावेळी त्याच्या हातात एक पेपरही होता.


रेल्वे स्टेशनजवळ आली आणि इतरांसोबत रेल्वेची वाट पाहणाऱ्या या तरुणानं रेल्वेसमोर उडी मारली... त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बोरिवलीमध्ये राहणारा शेख हा व्यवसायानं पेन्टर होता. 


घटना सीसीटीव्हीत कैद


पश्चिम रेल्वे मार्गावर लावण्यात आलेल्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही घटना कैद झालीय. 


३० मार्च रोजी सकाळी ८.१३ वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या गाडीखाली या तरुणानं आत्महत्या केलीय. परंतु, या घटनेचा व्हिडिओ आता वायरल झालाय.