मुंबई: होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया ठाकूर असं जखमी तरूणीचं नाव आहे. मुंबईकडे जाणा-या लोकलच्या दारात ही तरूणी उभी होती. पारसीकच्या बोगद्याजवळ येताच अचानक बाहेरून आलेला दगड या तरूणीच्या डोक्याला लागला. 


मात्र सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने तिचा हात घट्ट धरून आत ओढल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र या मुलीने आणि तिच्या पालकांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.