मुंबई : मुंबईतल्या मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी उद्या रविवारी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बाईक रॅलीत रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरातील जवळपास 50 हजार बाईकस्वार सहभागी होण्याचा अंदाज आहे. सायनच्या सोमय्या ग्राऊंडवरुन सकाळी नऊ वाजता या रॅलीला सुरुवात होईल.


ही रॅली दादर टीटी मार्गे जेजे फ्लायओव्हरवरुन गेट वे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत रॅलीतील बाईक्सना फ्लायओव्हरवरुन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.