मुंबई :  मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्चन्यायालय समोर असणाऱ्या याचिकेवर आज सरकार आपली बाजू मांडणार आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे सरकार आपली बाजू मांडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सत्तरहून अधिक पुरावे सरकारनं गोळा केलेत. त्यामुळे हे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत. 


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकार वेगवेगळ्या मंचावरून सांगण्यात आलंय. तरीसुद्धा राज्यात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीला अत्यंत महत्वाची आहे.