मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये कामोठेजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सायन - पनवेल महामार्ग आंदोलकांनी अडवला होता. तर शिर्डीतही नगर-मनमाड महामार्ग रोखण्यात आला. कोल्हारमध्ये रास्ता रोको करण्यात आला. शिर्डी शिंगणापूर वाहतूक विस्कळीत झाली होती. कोल्हार भगवती येथे महामार्ग अडवण्यात आला होता. 


हिंगोलीत पाचही ताल्युक्यात पन्नास ठिकाणी चक्का जाम करण्यात आला. लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक खोळंबली. लातूर शहरातल्या राजीव गांधी चौकातही मोठा चक्का जाम करण्यात आला. मराठा समाज पुन्हा एकदा बहुसंख्येनं रस्त्यावर उतरलेला. 


उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 


सातारा जिल्ह्यात ३० ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.  कराडमध्ये पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. नगर मनमाड महामार्ग अडवला.