मुंबई : मुंबई महापालिकेच्या थकबाकीच्या मुद्यावर मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्य सरकारला जोरदार टोला लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन भाजपनं बॅकफूटवर जाण्याचा मार्ग स्वीकारला. यानंतर तरी शिवसेना - भाजपमधली कूरबूर संपेल, अशी आशा वाटत होती. मात्र, सेनेच्या महापौरांच्या पहिल्याच भाषणानंतर ही कूरबूर इथेच थांबेल असं वाटत नाही. 


राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेची 1999 पासून प्रलंबित असलेली थकबाकी आहे. आर्थिक चणचणीमुळे पालिकेच्या नियोजित प्रकल्पांना पूर्ण करणं कठिण होऊन बसलंय, असं सांगत महाडेश्वर यांनी भाजपला चांगलेच चिमटे काढलेत. इतकंच नाही तर, ही थकबाकी मिळवण्याचा आपण विशेष प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. 


विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची 83 मतं मिळाल्यानंतर 171 मतांनी निवडून आलेल्या महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झालीय.