अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरतीप्रक्रियेच्या चौकशीचे आदेश
फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे. जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षततेची काळजी घेतली गेली नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकरांनी यांनी दिलं आहे.
मुंबई : फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे. जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षततेची काळजी घेतली गेली नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकरांनी यांनी दिलं आहे.
१९ फूट उंचावरून उडी टाकण्याचा जो निकष आहे त्यातील त्रुटी तपासून सुधारणा करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. परंतु जखमी मुलांवरील औषधोपचाराचा खर्च उचलण्याबाबत मात्र त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही.