कविता शर्मा, मुंबई : सूपर मॅन नाही, बॅटमॅनही नाही... मुंबईकरांना आता सापडलाय त्यांचा स्वतःचा रक्षक झाडू मॅन... मुंबईचा मस्कॉट झालेला झाडूमॅन हाती झाडू घेऊन मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देईल. मुंबईची आर्टीस्ट गायत्री जोशीच्या 'झाडूमॅन'ची ही सुपर कहाणी...


कचराकुंडीचा वापर करा रे बाबांनो... !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाती झाडू... उद्देश साफसफाई, हा आहे मुंबईचा नवा सुपर हिरो झाडूमॅन... अस्वच्छता पसरवणाऱ्यांना झाडूमॅन सुनावणार... हा आहे मुंबईचा रक्षक... मुंबईच्या सफाई कामगारांचं प्रतिनिधीत्व करणारा आपला झाडूमॅन... 


अस्सल मुंबईकर आर्टिस्ट आणि समाजसेविका गायत्री जोशींनी मुंबईकरांना दिलेली ही खास भेट... गायत्री जोशी या विविध ठिकाणी पेंटींग्जच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देतात. रस्त्यात कचरा टाकणे, थुंकणे अशा अनेक वाईट सवयी मुंबईकरांना आहेत. त्या सवयी गायत्री जोशींना व्यथीत करतात.


केवळ स्वच्छतेचा संदेश मुंबईकरांना देणं एवढाच गायत्री जोशींचा उद्देश नाही, तर मुंबईचे हिरो असलेले आपले सफाई कामगार हे खरं तर अनसंग हिरोच, पण त्यांच्या प्रती लोकांमध्ये आदर वाढवणं हाही उद्देश आहे. मुंबईचं अंधेरी स्टेशन, सीएसटी स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी झाडूमॅनचा मेसेज पेंट केला गेलाय.


याआधी 'पोलीस दीदी' आणि 'मिस्टर पू' नागरिकांना माहित होता... त्याचप्रमाणे झाडूमॅनही लोकांना शिस्त लावायला रस्त्यावर उतरलाय. महिलांच्या आत्मसन्मानासाठी 'पोलीस दीदी' काम करत होती... तर लोकांनी प्रसाधनगृहात जावं यासाठी 'मिस्टर पू' काम करत होता... आता मुंबईत गायत्री जोशींनी तयार केलेला झाडूमॅनही मुंबईकरांना स्वच्छतेची शिस्त लावायला प्रोत्साहन देतोय.