मुंबई : रेल्वेवरील महत्त्वपूर्ण कामांसाठी उद्या रेल्वेच्या चारही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे अशा चारही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही सेवा रद्द राहणार असून सर्वच सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बर मार्गाच्या अंधेरी ते गोरेगाव या विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून उद्या पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा महा-मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत जोगेश्वरी स्टेशनवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे- माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो लाईन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३०


हार्बर रेल्वे- सीएसटी ते चुनाभट्टी, माहिम डाऊन हार्बर लाईन, सकाळी ११.४० ते ४.४०


चुनाभट्टी/माहिम- सीएसटी, अप हार्बर लाईन- ११.१० ते ४.१०