मुंबई: मुंबईच्या पश्चिम आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. अप आणि डाऊन स्लो मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते 3.35 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या काळात बोरीवली आणि गोरेगावमधील वाहतूक फास्ट मार्गावरून चालवण्यात येईल, तसंच काही लोकल गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत. 


तर हार्बर रेल्वे लाईनवर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 या वेळेमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यान दुरुस्तीची काम असल्यानं हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकवेळी अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक सकाळी 9.52 ते दुपारी 3.45 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. 


हार्बर रेल्वेवरची सीएसटी ते वांद्रे- अंधेरी दरम्यानची वाहतूक 10.44 ते 3.49 या वेळेमध्ये बंद असणार आहे.