मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेन लाईनवर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान फास्ट अप मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. 


हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी दरम्यान बंद असेल. पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बांद्रा स्थानकादरम्यान 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.