मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय. रविवारी म्हणजेच आज सकाळी 10 ते दुपारी 1 या काळात ब्लॉक घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण स्थानकात नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम या ब्लॉकच्यावेळेत केलं जाणारय. या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल गाड्या आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होईल. 


कल्याण स्थानकातल्या 1, 1-ए, 2,3,4 वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहतील. त्यामुळं कल्याण लोकलसह टिटवाळा, आसनगाव आणि कसारा लोकल रद्द करण्यात आल्या.