मुंबई : मुंबईमधील उरणमध्ये नौसेनेच्या बेस कॅम्पजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी हत्यारांसह काही संशयित लोकांना पाहिल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर नेवीने हाय अलर्ट जारी केला आहे. उरणमध्ये भारतीय नौसेनेचं युद्ध सामग्रींचं भंडार आहे.


युद्ध भंडारजवळ 5 संशयित दिसले ज्याच्याकडे हत्यार असल्याचं समोर आलं आहे. ज्यांनी काळे कपडे घातले होते आणि आपले चेहरे झाकले होते अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नौसेनेने ही सूचना गंभीरपणे घेतली आहे. पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाला अलर्ट करण्यात आलं आहे. उरण हे मुंबईपासून 50 किलोमीटर अतंरावर आहे. मुंबई हे भारतातील एक अतिशय महत्त्वाचं शहर असल्याने ते नेहमी दहशतवाद्यांच्या निशान्यावर राहिलं आहे.