मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादी आणि मनसे पाठोपाठ आता एमआयएम ही निवडणुक आखाड्यात उतरली आहे.


एम आय एम पक्षाचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी गोवंडीत शिवाजीनगरातल्या रफिकनगर मधे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षावरही तोंडसूख घेतलं. तर मोदींवरही टीकास्त्र सोडलं.