मीरा-भाईंदर महापलिका निवडणूक : राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत दाखल
आता आगामी मीरा-भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इनकमींग सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हे इनकमींग सुरु झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
मुंबई : आता आगामी मीरा-भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इनकमींग सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हे इनकमींग सुरु झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक कमलेश भोईर यांच्यासह पक्षाच्या आजी माजी नगरसेवक आणि उपमहापौरांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातील नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा आहे.
भोईर यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याबाबत माहिती दिली. तर निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.