मुंबई : राज्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. राज्यातील २२ नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहेत तर एकूण ५१  ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या 3510 जागांपैकी तब्बल 851 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेत.


या निकालांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला मार्मिक टोला हाणला आहे. हा नोटबंदीचा विजय नसून, हा जुन्या नोटांचा विजय आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेला फक्त 16 जागांवर यश मिळालं आहे, तर खेड नगरपालिकेमध्ये मनसेचे वैभव खेडेकर हे नगराध्यक्ष झाले आहेत.