`अब की बार फक्त डान्स बार`
राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका
मुंबई : डान्स बार संबंधित राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यानंतर आता विरोधक ही राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. डान्स बारच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात डान्स बार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. पण कोर्टाने नंतर यावरील बंदी उठवली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारने नीट अभ्यास न केल्यामुळे आपली बाजू मांडू न शकल्याचं वक्तव्य केलं होतं.
राज ठाकरे यांनी याच मुद्दयावर भाजप सरकारला प्रश्न विचारला आहे. राज यांनी म्हटलं की, 'तुम्ही कुठे कमजोर पडलात ? एकतर तुमच्या मध्ये इच्छाशक्ती नाही किंवा तुमचे डान्स बार मालकांशी साटंलोटं असले पाहिजे अशी टीका राज यांनी केली आहे.
'अच्छे दिन कोणासाठी आले आहे हे यावरून दिसतंय. अच्छे दिन डान्स बार मालकांसाठी आले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार आहे त्यामुळे भाजप काय निर्णय घेतं हे पहावं लागेल. अनेक प्रकरणं कोर्टात प्रलंबित असतांना डांस बार प्रकरणाचाच सुनवाई इतक्या लवकर लवकर कशी होते ही विचाक करण्यासारखी गोष्ट आहे. 'असं राज यांनी म्हटलं.
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील आज या संबंधित एक ट्विट करुन भाजप सरकारवर टीका केली आहे.