मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांची खास भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राजकीय चर्चा रंगत असताना नांदगावकर यांनी घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांना भेटल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 


देशाची आर्थिक राजधानी मुंबई या महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी तयारीही केली आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. यातच मनसे नेत्यांने राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थिती लावणे, याचीच चर्चा सुरु झाली.


मनसेला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. यात प्रवीण दरेकर, नाशिकमधील वसंत गीते यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे नांदगावकरही हेच पाऊल उचलतात का, याची चर्चा होती. मात्र, घरगुती कार्यक्रम असल्याचे सांगून नांदगावकर यांनी राजकीय हवा काढून घेतली.