दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेत मंत्री फेरबदलाची मागणी आमदारांकडून जोर धरत असतानाच मनसेतही तीच स्थिती पाहायला मिळत आहे. पक्षाचे नेते-सरचिटणीस बदला अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाचे माजी नगरसेवक,प्रवक्ते संदीप देशपांडे आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही मागणी केलीय. राज ठाकरे यांचे ब्लू आईड बॉय मानले जाणाऱ्या देशपांडे आणि खोपकर यांनी आज सकाळी एक ट्विट केलंय. त्यात राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेच्या मेळ्याव्यातील एका विधानाचा संदर्भ देत नेते-सरचिटणीस यांच्या फेरबदल करा अशी मागणी केलीय.


'सतत सकारात्मक बदल हे प्रगतीचे लक्षण' या विधानाचा संदर्भ देत 'मग पक्षात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे' असं देशपांडे आणि खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलेय.


महापलिका निवडणुकीच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काल 'कृष्णकुंज' झालेल्या चिंतन बैठकित राज ठाकरे विरुध्द नेते-सरचिटणीस अशी खडाजंगी झाली होती. पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न झाला होता.  


या घटनेला अवघे 24 तासही उलटत नाही तोपर्यंत देशपांडे आणि खोपकर यांनी केलेल्या मागणीमुळे पक्षात खळबळ माजलीय. या मागणीला पक्षातील कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्किंगवर पाठिंब्याचा प्रतिसाद दिलाय. त्यामुळे देशपांडे-खोपकर यांनी केलेल्या मागणीला राज ठाकरे नेमका काय प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.


कोण आहेत मनसे नेते ?


बाळा नांदगावकर


नितीन सरदेसाई


अविनाश अभ्यंकर


शिरीष सावंत


अनिल शिदोरे


जयप्रकाश बाविस्कर


संजय चित्रे


दीपक पायगुडे


कोण आहेत मनसे सरचिटणीस ?


मनोज चव्हाण


आदित्य शिरोडकर


ऍड.राजेंद्र शिरोडकर


शालिनी ठाकरे


रिटा गुप्ता


राजू पाटील


राजा चौगुले


प्रकाश भोईर


कोणी केला मनसेला 'जय महाराष्ट्र' ?


प्रवीण दरेकर


वसंत गिते


अतुल चांडक


शिशिर शिंदे ( नेते पदाचा राजीनामा, स्वेच्छा निवृत्ती )


संजय घाडी


संजना घाडी


मंगेश सांगळे


शिल्पा सरपोतदार


श्वेता परूळकर


दिगंबर कांडरकर