मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही  बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत अध्यक्ष राज ठाकरे चर्चा करणार आहेत. पदाधिकारी बैठकीत 36 मतदारसंघातील अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.


लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा आता महापालिका निवडणुकीत मनसेनेने सपाटून मार खाल्ला. दिवसागणित मनसेला पराभवाची चव चाखालया लागत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या राजकीय पक्षांचा आसरा घेतला. पराभवानंतर आमदार, नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्ष वाढीवर याचा परिणाम झाला. 


तर नाशिक पालिकेतील सत्ता विकास कामे करूनही गेली. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. जनतेने मला चांगलाच धडा शिकवला आहे. आता मी माझ्या मार्गाने जाणार, जे सत्ताधाऱ्यांनी विकास न करता केले ते फासे मी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात टाकणार, असे सांगत विरोधकांना आव्हान दिलेय. पराभव होत असतो. हा शेवटचा पराभव आहे, यापुढे पराभव पाहणार नाही. तुम्ही माझ्यापर्यंत येत होता. आता मी तुमच्याकडे येणार, असे सांगत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे आजच्या चिंतन बैठकीतनंतर राज ठाकरे भाष्य करणार का, याची उत्सुकता आहे.