`आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात वर्ष लागेल`
बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.
मुंबई : बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.
काय म्हणाले राज ठाकरे
- नेत्यांच्या नावांवर सर्वाधिक बेकायदेशीर इमारती
- डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर आयुक्त म्हणतात तीन महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात मला एक वर्ष लागेल
- ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय
- ठाण्यातील चारही पक्ष एकत्र बसतात आणि यांचे नेते बिल्डर आहेत, यांची सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकामं आहेत आणि टांगती तलवार तुमच्या डोक्यावर
- कल्याण डोंबिवली महापालिकेला ६५०० कोटींचं आश्वासन दिल, पण आजपर्यंत साडेसहा रुपये पण नाही दिले
- आकड्यांच्या भुलथापांना बळी पडू नका
- सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत?
- दिव्यात गाडीकरता सोडा, साधा बैलगाडीसाठी पण रस्ता नाहीये, तरीही सेना भाजपला याचं काहीच वाटत नाही
- निवडणुका संपल्या की सर्व काही संपतं
- नोटाबंदी फसल्याने मोदी नोटाबंदीवर बोलायचे बंद झाले... निवडणुकीच्या वेळेस पैसा बाहेर येतो... भाजपकडे पैसे आले कुठून
- विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी दिले होते, म्हणजे २८८ कोटी २८८ उमेदवारांकरता. एवढे पैसे आले कुठून?
- शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच बोटीत होते... मोदींनी यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही
- पंतप्रधानांनी ज्यावेळी ढुंकूनही पाहिलं नाही.... तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता... आत्तापर्यंत का थांबले?