माफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा
कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
मुंबई : कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
कपील शर्मानं केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा मनसेनं केला आहे. कपीलनं याबाबत पुरावा द्यावा अन्यथा त्याच्या शोचं शुटिंग बंद पाडू असा इशारा मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल कपीलनं ट्विटरवरून विचारला होता. कपीलच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे.