मुंबई : मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर आणि वांद्रे विधानसभा अध्यक्ष तुषार आफळे यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबर मनसे कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात अमेय खोपकर आणि तुषार आफळे यांनी महापलिका विभागीय कार्यालयात आंदोलन केलं होतं.


यावेळी महापालिकेचा भूखंड वाचवण्यासाठी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांच्या दालनाबाहेर या दोघांसह मनसे कार्यकर्ते क्रिकेट खेळले होते. याप्रकरणी पोलिसांनी तुषार आफळेंना अटक करुन त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा नोंदवलाय. महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून दंगलीचा गुन्हा लावल्याचा अमेय खोपकर यांचा आरोप आहे.