मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये सुरु होणार?
मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये...
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा आहे दुसरा टप्पा.एकूण 10 स्टेशन.
या संदर्भात फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोरेलच्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली होती.
आता हे काम जवळ जवळ पूर्ण झालं आहे त्या मुळे मोनो रेल चा दुसरा टप्पा कधी सुरु होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना लागली आहे. या वर्षी जून अखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर चाचण्या घेणार आहेत.
या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनोचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार हे स्पष्ट होणार आहे. अनेकदा डेड लाइन हुकलेली मोनो 2 आता ऑक्टोबर- नोव्हेंबर 2017 मधे सुरू होण्याची शक्यता आहे.