मान्सून अंदमानमध्ये पाच दिवसांत, मुंबईत १२ जूनपर्यंत पाऊसधारा
आता एक गूडन्यूज. येत्या ५ ते ७ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. तर मुंबई १२ जूनपर्यंत पाऊस पडण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
मुंबई : आता एक गूडन्यूज. येत्या ५ ते ७ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. तर मुंबई १२ जूनपर्यंत पाऊस पडण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
दरम्यान मान्सून १८ ते २० मेदरम्यान अंदमानात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केलाय. खासगी हवामान संस्था स्कायमेटनं हा अंदाज वर्तवलाय. तर मुंबईत १२ जूनपर्यंत पाऊसधारा बरसण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये २८ ते ३० मेदरम्यान मान्सूनचं आगमन होणार आहे. यंदा ३ ते ४ दिवस आधीच मान्सून दाखल होत असल्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यंदा सरासरीच्या २७ टक्के पाऊस अधिक बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.