मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं सर्वसाधारण भाकित वर्तवणारा एक नकाशा हवामान खात्यानं जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानुसार 20 मे रोजी पाऊस अंदमान-निकोबारला दाखल होईल. 1 जूनला, म्हणजेच वेळेवर, केरळमार्गे तो भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश करेल. 


त्यानंतर त्याचा प्रवास अडथळ्याशिवाय सुरू राहिला, तर 7 ते 10 जूनदरम्यान मुंबईमध्ये पहिला पाऊस बरसेल. राजधानी दिल्लीमध्ये 29 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.