मुंबई : विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ आणि तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहेच. त्यामुळे आज जर प्रगती कायम राहिली, तर मोसमी पाऊस मुंबापुरीत दाखल होईल असं मानलं जातंय. दरम्यान, काल झालेल्या पावसानं मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं. नेहमीप्रमाणे हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं.  


संध्याकाळपासून अवघ्या 24. 25 मिलीमीटर पावसानं मुंबईचे हे हाल केलेत. त्यातच पाणी उपसणारा एक पंप बंद पडल्यानं पाण्याचा निचरा होण्यातही अचडणी येतायत. पहिल्याच पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे सर्व दावे फोल ठरवलेत. पहिल्याच पावसात ही स्थिती आहे, तर पुढले 3-4 महिने आपलं काय होणार याची चिंता आता मुंबईकरांना भेडसावतेय.