मुंबई : देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली. याआधीच याप्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आलीय. त्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली.


देवनार डंपिंग ग्राउंडची आग ही लागली नसून लावल्याचं उघड झालं होतं. या संदर्भात मुंबई महापालिकेनं पोलिसांत तक्रारही दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ९ भंगार माफियांना अटक केली होती.