मुंबई : महाराष्ट्राचं गृहखातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना मुख्यमंत्र्यांकडून महत्वाचं गृहखातं सांभाळलं जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून सतत होत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्याविरोधातच सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. गेल्या २० महिन्यात ७१ हजार ४७५ तक्रारी आल्याची माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे.


दरम्यान, देवेंद्र सरकार आल्यानंतर मागील २ वर्षात ३१ खात्यांविरोधात  २ लाख ४४ हजार ११२ तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक तक्रारी या गृह खात्याविरोधात आहेत. 


गृह खात्याविरोधात तब्बल ७१ हजार ४७५ तक्रारी आहेत. तर महसूल आणि वन खात्याविरोधात २४ हजार २९३ तक्रारी आहेत. तर नगर विकास विरोधात १५ हजार ३८८ तक्ररी करण्यात आल्या आहेत. तर सामान्य प्रशासनाकडे ९ हजार ४६१ आणि, ग्रामीण विकासाकडे ९ हजार ३६८ एवढ्या तक्रारी केल्या आल्या आहेत.